HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर शहराच्या आमदारांविरोधात खोटी बातमी प्रसिद्ध केल्याने निखिल वागळे याच्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर शहराच्या आमदारांविरोधात खोटी बातमी प्रसिद्ध केल्याने निखिल वागळे याच्या विरोधात गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.७ फेब्रुवारी

राहुरी येथील आढाव वकील पती-पत्नीच्या हत्ये मध्ये अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा हात असल्याची बातमी काही युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आली होती मात्र याबाबत आता थेट राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून ज्या प्रकरणाचा आणि आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी अटक झाले असून खून हा खंडणीच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या प्रकरणातील सर्व सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलीय

मात्र एका युट्युब चॅनलच्या माध्यमातून निखिल वागळे नामक पत्रकाराने थेट आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा या खुनामध्ये हात असल्याचा आरोप केल्याने अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात निखिल वागळे तसेच शिवसेना केडगाव फेसबुक चालवणारे सुनील सातपुते यांच्या विरोधात दाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड राजाराम आढाव आणि अॅड मनीषा आढाव यांचे २५ जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातून सिनेस्टाईल अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर हत्याकांडांचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या यु टूब चॅनेवर स्थानिक नागरिकांचा हवाला देत सदर हत्याकांडातील टोळी ही अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संमधीत टोळी आहे अन् ही टोळी अजित दादाची देखील संबंधित असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी माञ या वक्तव्याचे खंडण करत यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा असुन केवळ खंडणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. टोळीतील आरोपी सागर खांदे, शुभम महाडिक,हर्षल ढोकणे,बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील असून आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासात आढळून आलेला नाही अशी पोलिसांनी दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular