अहिल्यानगर दिनांक १८ मे
रविवारी नगर शहरात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. नीलक्रांती चौक ते दिल्लीगेट परिसरात चांगलेच पाणी साचल्याने या ठिकाणावरून दुचाकीवरून आणि पायी पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर या परिसरात असलेल्या उसाचा रस विकणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले आहे.
शहरातील सध्या रस्त्यांचे कामे सुरू असून अंतर्गत गटाऱ्यांचेही कामे सुरू असल्यामुळे पहिल्याच पावसात या ठिकाणी पाणी साचले आहे या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून अनेक वर्षांपासून महानगरपालिका पाईप टाकून पाणी सीना नदीकडे वळवण्याच्या दृष्टीने काम करत आहे मात्र लाखो करोड रुपये खर्च होऊ नये या ठिकाणच्या पाणी साचण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही हे विशेष