Homeक्राईमखान आणि शिंदे या सळई तस्करांच्या मुसक्या पोलिस अवळनार का ?...

खान आणि शिंदे या सळई तस्करांच्या मुसक्या पोलिस अवळनार का ? सरकारला लाखो रुपयांचा चुना लावत सुरू आहे अवैद्य लोखंडी सळई विक्री.. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब आता तुम्हीच लक्ष घाला… तरच हा अवैध व्यवसाय बंद होऊ शकतो..

advertisement

छत्रपती संभाजीनगर दि.१८ जानेवारी
छत्रपती संभाजीनगर आणि जालना रोडवरील टोल नाक्या शेजारी असलेल्या “खान” नामक व्यक्तीचे आणि बाशेद्रा एमआयडीसी परिसरातील मुख्य महामार्गावरील “शिंदे” या दोघांची अवैद्य दुकाने थाटून सळई तस्करी जोरात सुरू आहे. मात्र या लोखंडी सळई तस्करी कडे पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येतेय.

स्टील माफिया “खान” आणि “शिंदे” प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावून अवैद्य तस्करीचे डॉन झाले आहेत.छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण स्थानिक पोलीस या सळई तस्करांच्या बाबत कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता विशेष पोलीस महानिरीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून हे अवैध धंदे बंद करण्याची गरज आहे. याची साखळी फार मोठी असून जालना ते मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही साखळी कार्यरत आहे.

जालना येथून मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात जाणाऱ्या लोखंडी सळीई वाहनांकडून सळई छुप्या मार्गाने विकत घेऊन त्या बाजारभावापेक्षा कमी दराने विकण्याचा धंदा मोठ्या जोरात सुरू असून भर महामार्गावर हे अवैध धंदे सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना रोडवरील टोल नाक्या शेजारी असलेल्या “खान” नामक व्यक्तीचे आणि बाशेद्रा एमआयडीसी परिसरातील मुख्य महामार्गावरील “शिंदे” यांनी खुलेआम अवैद्य धंदे सुरू ठेवून पोलीस आणि महसूल प्रशासनाला एक प्रकारे आव्हान दिले आहे.

बर हा प्रकार सुरू असताना पोलिसांना याची माहिती नसणे असे होणारच नाही त्यामुळे जालना पोलीस अधीक्षक आणि छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त बघ्याची भूमिका का घेत आहे असाही प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

जालना पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अथवा संभाजीनगरचे गुन्हे शोध पथक नेमक काय करतेय यावरही आता प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. स्थानिक गुन्हे शाखा अनेक अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई करत असतात संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना असतो मग सर्वच या सळई तस्करी कडे प डोळेझाक का करतात असा प्रश्नही उपस्थित होतोय. जालना ते संभाजीनगर परिसरामध्ये “खान” आणि “शिंदे” यांचे महामार्गावर वर्चस्व असून अवैद्य सळई तस्करीचा धंदा दोघांनीही जोमात सुरू ठेवला आहे.यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पद्धतशीर कार्यक्रमही केला जातो. तसेच धंद्याला कोणी आडवे आले तर त्याला आडवे करण्याचे खास हातखंडे “शिंदे” आणि “खान” यांच्याकडे असल्यामुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

जालना येथे लोखंडी सळीई उत्पादनाच्या विविध कंपन्या असून या कंपन्यांचा माल राज्यभर वितरित केला जातो राज्य शासन आणि केंद्र शासनाचे मोठमोठे प्रकल्प यांनाही कंपन्यांकडून माल पुरवला जातो त्यासाठी मोठ मोठ्या ट्रक मधून राज्यभर मला वितरित केल्या जात असताना मापात पाप करून ठरविक ठिकाणी या चारचाकी ट्रक मधून चोरून लोखंडी लोखंडी सळया काढल्या जातात आणि तो माल बाजार भावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना विकला जातो यामध्ये महिन्याला करोडो रुपयांची उलाढाल होत असून यामध्ये ट्रक चालक आणि लोखंडी सळई विकत घेणारे तस्कर यांचे लागेबंध असल्यामुळे हा प्रकार मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे.

हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना रोडवरील टोल नाक्या शेजारी असलेल्या “खान” नामक व्यक्तीचे आणि बाशेद्रा एमआयडीसी परिसरातील मुख्य महामार्गावरील “शिंदे” यांच्या मोठमोठ्या शेडवर पोलिसांनी जाऊन तपासणी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात मात्र यासाठी आता छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
तसेच राज्याच्या महसूल खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण करोडो रुपयांचा महसूल अवैद्य मार्गाने सरकारकडे न जाता दुसऱ्याच्या खिशात जात असल्यामुळे पोलिस आणि महसूल खात्याने संयुक्त कारवाई करून “शिंदे” आणि “खान” सारख्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular