Homeराजकारणसट्टा बाजार तेजीत नगर मध्ये नगर शहर मतदार संघात कोणाला किती भाव

सट्टा बाजार तेजीत नगर मध्ये नगर शहर मतदार संघात कोणाला किती भाव

advertisement

अहिल्यानगर दिनांक 21 नोव्हेंबर

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीची मात्र या आधी आता प्रत्येक चौकाचौकात आपसात पैजाही लागू लागल्या आहेत कोण निवडून येणार यावर चांगल्या गरम चर्चा घडत आहेत. कोणाची जादू कशी चालली तुतारी वाजली का घड्याळ चाललं यावर प्रत्येक जण आपापले मत मांडताना उदाहरण देत आहेत.

अहिल्यानगर शहर मतदारसंघात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी आता थंडवली असून प्रतीक्षा लागली आहे ती निकालाची. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगर शहरांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत असताना या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीचा कुठेच बोलबाला दिसला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी शेवटच्या पाच दिवसात निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती मात्र त्यांचा घात शेवटच्या दोन दिवसांनीच केला केडगाव मधील शिवसैनिकांचे हत्याकांड कुणीही विसरले नसताना त्यांनीच शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे अनेक जण नाराज झाले होते त्याचा फटका या निवडणुकीत बसू शकतो तर ठराविक मतदार एक शिक्का तुतारी चालवणार अशी ही चर्चा झाल्यामुळे दुसरा वर्ग नाराज झाला आणि तो आपोआप घड्याळाकडे वळला अशी ही चर्चा सध्या सुरू आहे.

निवडणूक संपल्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी आता थेट आमदार संग्राम जगताप यांचे अभिनंदनचे फलक लावले आहेत तर सट्टा बाजार ही सध्या जोरात आहे. नगर शहर मतदारसंघात सट्टा बाजारामध्ये आमदार संग्राम जगताप यांना पाच पैसे तर अभिषेक कळमकर यांना एक रुपया असा भाव सध्या मिळत आहे. तर शेवटी शेवटी आमदार संग्राम जगताप यांना एक ते दोन पैशावरही भाव गेला आहे त्यामुळे सध्या सट्टा बाजार जोरात सुरू असून विविध ठिकाणी उमेदवार कोण निवडून येणार याच्यावर पैजा लागलेल्या आहेत मात्र या सर्व जर तरच्या चर्चा असून 23 तारखेलाच कळेल मतदारांनी खरा कौल कोणाला दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular