अहिल्यानगर
राहुरी मतदार संघात मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी पडसाद उमटले असून पांढरी पुल येथील एका गावात गोळीबाराची घटना घडली असून यात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मंत्री आणि पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाल्याची चर्चा असून निवडणुकीच्या कारणावरून हा प्रकार झल्याचे समजते आहे. या घटनेत संजय नवले हे डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत तर भाऊसाहेब नवले यांना गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे नवले हे नवनिर्वाचित आमदार कर्डिले समर्थक असल्याचे कळते आहे. जखमी नगराधील सुरभी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे घटना दहा वाजता घडली असल्याची माहिती मिळतेय.