मुंबई दि.१३ जुलै
शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार असल्याची चर्चा सध्या असून या युतीबाबत पहिला फोन कोणी करायचा या घोळा मध्ये सध्या ही युती अडकली असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी केली असून या फोनमुळे सध्या युती खोळंबली आहे. याबाबत दीपक केसरकर यांनीही आपली भूमिका जाहीर केली असून जर मविआ बरोबर आघाडी तोडली तर आपण भाजप बरोबर जाऊ असा संदेश त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत बंडखोरी केल्यानंतर दिला होता असं सांगितले आहे. तर सध्या एकनाथ शिंदेंमुळे भाजप शिवसेना युती असल्याचे भजाप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
शरद पवारांनी बळजबरीने उद्धव ठाकरे यांना हात वरती करून मुख्यमंत्री केलं जोपर्यंत उद्धव ठाकरे हे सांगत नाही की आपण महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो आहे. तोपर्यंत भाजप आपली भूमिका जाहीर करणार नाही त्यामुळे सध्या शिवसेनेतून बंड केलेल्या एकनाथ शिंदे गटाबरोबर आम्ही केली असून ते मूळचे शिवसैनिकच आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ते प्रेरित असल्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर युती केल्याचं मान्य करतो असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला आहे.