Homeक्राईमअबब..अठरा कोटी बाहत्तर लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी... नामांकित ज्वेलर्सचा मॅनेजर आणि...

अबब..अठरा कोटी बाहत्तर लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी… नामांकित ज्वेलर्सचा मॅनेजर आणि नगर शहरातील त्या तीन जणांचा समावेश…तीन अटकेत एक फरार..

advertisement

पुणे दिनांक २७ एप्रिल

अहिल्यानगर मधील एक कुटुंबातील आई वडील आणि मुलगी यांनी पुण्याच्या एका नामांकित ज्वेलर्स मध्ये कामाला असलेल्या एका सेल्समन ला पकडून जवळपास एक कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास करून फसवणूक केल्याचा गुन्हा पुणे येथे दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी नगर मधून तीन जणांना अटक केली आहे.

Oplus_0

या घटनेची हकीकत अशी कोण पुणे येथील प्रसिद्ध असे रांका ज्वेलर्स प्रा.लि. कंपनी या दुकानात प्रशांत कांतीलाल बर्मेचा हे कमला होते.अनेक वर्षापासून कामाला असल्याने दुकानातील बरचसे व्यवहार त्यांना माहिती होते.रांका ज्वेलर्स प्रा.लि. कंपनीचे मार्च 2026 मध्ये वार्षिक ऑडिटकामी स्टॉक व्हेरिफिकेशन करताना सोन्याचे दागिण्या मध्ये 12,800/- ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने व 72,00,000/- रुपयांचा हिशोब कंपनीच्या संचालक असलेल्या श्रेयस अशोक रांका यांना लागला नाही. त्याबाबत त्यांनी दुकानात चौकशी केली तेव्हा त्यांच्या असे र्निदशनास आले की दुकानात कामस असलेला प्रशांत कांतीलाल बर्मेचा याने दुकानातुन कंपनीच्या संचालकांना पालकांना न सांगता काही रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचे लक्षात आले.या मध्ये चोरलेले दागिने आणि पैसे कविता रमाकांत पराळे, हिस देवुन अफरातफर करून फसवल्याचे लक्षात आल्यानंतर श्रेयस रांका यांनी पुणे पोलिसात धाव घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत कांतीलाल बर्मेचा हा 1992 पासुन सेल्समन म्हणून कामस होता. त्या पूर्वीही त्याने दहा वर्ष त्यांच्याकडे कामास होता.चाळीस वर्षांचा कामाचा अनुभव असल्याने त्याने रांका यांचा विश्वास संपादन केला होता.त्या मुळे प्रशांत बर्मेचा यांना कंपनीने मॅनेजर म्हणुन जबाबदारी दिली होती. अनुभवी असल्याने प्रशांत बर्मेचा कंपनीला सोने पुरवणारे, व्यापारी व ग्राहक यांचे सोबत व्यवहार करीत होता. त्याचे कामावर विश्वास ठेवुन कंपनीने प्रशांत बर्मेचा यास सोने पुरवठादार व ग्राहक यांच्या कडुन सोन्याचे दागिने खरेदि ब्रिकीची जबाबदारी दिली होती.

मात्र मागिल सात ते आठ महिन्यापासुन कविता रमाकांत पराळे या अहिल्यानगरच्या महिलेने तसेच त्यांची मुलगी आणि पती रमाकांत पराळे हे रांका ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची ओळख प्रशांत बर्मेचा याचे सोबत झाली. कविता पराळे यांनी प्रशांत बर्मेचा याचे सोबत ओळख वाढवली व त्याचे सोबत मैत्रीचे संबध र्निमाण केले. त्यानंतर कविता पराळे वारंवार दुकानात येवु लागल्या, कविता पराळे त्याचे पती रमाकांत पराळे व त्यांची मुलगी हे तिघे नेहमी शोरुमध्ये येत असल्याने त्यांना सर्व स्टाफ वैयक्तीक रित्या ओळखत होता कविता पराळे यामनी प्रशांत बर्मेचा याचेकडुन दागिने घेण्यास सुरुवात केली. दागिने घेताना रमाकांत पराळे व कधी मुलगी ही देखील दुकानांत येत असे, प्रशांत बर्मेचा याने सोन्याचे दगिन्याची विक्री न दाखवता जागड (अँप्रुव्हल तत्वावर) कंपनीचे संचालकांना कळु नये याकरीता स्वतः पसस्पर कम्युटरवर नोंदी करुन कविता रमाकांत पराळे यांना दुकानात व काहि वेळा दु‌कानाचे बाहेर उभी असलेल्या कार मध्ये देत होता. वास्तविक प्रशांत बर्मेचा याने दुकानाचे कॅश काऊंटरवर सोन्याचे दागिण्याची विक्री दाखविणे आवश्यक असताना, प्रशांत बर्मेचा याने कंपनीने त्याचेवर ठेवलेल्या विश्वासाचा गैर फायद घेवुन, कंपनीचे इतर संचालकाची परवानगी न घेता कंपनीची फसवणुक करुन, अपहार करण्याच्या हेतुन कविता पराळे, त्यांची मुलगी आणि काही वेळा रमाकांत पराळे यांचे ताब्यात देवुन कंपनीचा विश्वासघात करुन कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करत होता.

प्रशांत बर्मेचा दुकानात मॅनेजर म्हणुन असल्याने तो दुकानातील सेल्सगर्ल कडुन ग्राहकांना दागिने जांगड (अँप्रुव्हल तत्वावर) द्यायचे आहे असे सांगुन त्यांचेकडुन दागिने ताब्यात घेवुन, प्रशांत बर्मेचा स्वतः जांगड (अँप्रुव्हल तत्वावर) नोंद करुन कविता रमाकांत पराळे, त्यांची मुलगी आणि रमाकांत पराळे यांना देत होता. अशा प्रकारे प्रशांत बर्मेचा, कविता रमाकांत पराळे, त्यांची मुलगी आणि रमाकांत पराळे यांनी संगणमत करुन रांका ज्वेलर्स या कंपनीची फसवणुक केल्याचा गुन्हा पुणे येथे दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत बर्मेचा याने ग्राहकांनी मोड म्हणुन दिलेले जुने दागिने देखील कविता पराळे, रमाकांत पराळे व मुलगी यांना वेळोवेळी एकूण 12,800 ग्रॉम वजानाचे किंमत 18,00,00,000/- रुपयांचे सोन्याचे दागिने आणि जानेवारी 2026 च्या पहील्या आठवड्यात प्रशांत बर्मेचा याने तिजोरी मधील 72,00,000/- रुपयांची रोख रक्कम
कविता पराळे हिच्या जवळ पोहोच केली होती.अशी सुमारे 18,72,00,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम
प्रशांत बर्मेचा, कविता पराळे, कविताची मुलगी आणि पती रमाकांत पराळे यांना देऊन रांका ज्वेलर्स या कंपनीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्या नंतर पुणे पोलिसांनी अहिल्यानगर येथे येऊन
रमाकांत पराळे आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन अटक करून पुणे येथील कोर्टात हजर केले होते. पुणे येथील कोर्टने त्याना २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आज कविता पराळे,हिला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता या प्रकरणाच्या तपास करण्यासाठी न्यायालयाने कविता पराळे, हिस तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात आरोपींच्या वतीने अँडव्होकेट महेश तवले , संजय दुशिंग ,सतिश गीते, संजय वालेकर यांनी काम पाहिले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular