Homeराजकारणनव्या वर्षात उद्धव ठाकरेंना अहील्यानगर शहरात जबर धक्का.. नगरसेवकांसह पदाधिकारी शिवसैनिक...

नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना अहील्यानगर शहरात जबर धक्का.. नगरसेवकांसह पदाधिकारी शिवसैनिक करणार ‘जय महाराष्ट्र’

advertisement

अहिल्यानगर दिनांक 3 डिसेंबर

अहिल्या नगर शहरात मोठा राजकीय भूकंप होणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडण्याची चिन्ह दिसत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते मात्र भाजपमध्ये जायचं का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे याबाबत अनेकांचे दुमत असल्याने हा प्रवेश अनेक दिवस लांबला होता मात्र आता अखेर काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून याच्या प्राथमिक बोलण्यासाठी आज नगर शहराचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन जाधव यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत . आसा दुजोरा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे

त्यानंतरच सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा प्रवेश हा मुंबईत ठेवायचा की अहिल्यानगर शहरामध्ये भव्य कार्यक्रम ठेवून प्रवेश सोहळा ठेवायचा याबाबत निर्णय होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिले आहे. मात्र आज सर्व नगरसेवक आणि शिवसेनेचे नेते सचिन जाधव, अनिल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक मुंबईला रवाना होणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular