Homeशहरप्रभाग क्रमांक चार चकाचक होणार आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून...

प्रभाग क्रमांक चार चकाचक होणार आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून मिळाले सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी सुमारे 45 .71 कोटी… सर्वच रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे..

advertisement

अहमदनगर दि.१५ मार्च

अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक चार मध्ये सुमारे 45.71 कोटी व अंतर्गत रस्त्यांकरीता 26.09 कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून हा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच या सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या सर्व कामास जलद गतीने सुरुवात होणार आहे.अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक चार हा चकाचक होणार आहे. कारण प्रभागातील सर्वच रस्ते आता सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याने हा प्रभाग एक वेगळेच रूप धारण करणार आहे. विकास निधीची फक्त घोषणा नव्हे तर पैसा उपलब्ध करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून फक्त आचारसंहिता संपल्या नंतर हे काम सुरू होण्याच्या वाट प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना पहावी लागणार आहे.


प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभाताई बोरकर, ज्योतीताई गाडे, अजिंक्य बोरकर आणि अमोल गाडे यांच्या सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक 4 साठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

अशी असतील प्रभाग क्रमांक चार मधील विविध रस्त्यांची कामे

६.५० कोटी – गंगा उद्यान टी. पी. स्किम 04 फायनल प्लॉट क्र. 262 पब्लिक पार्क विकसित करणे

१ कोटी – प्रकाशपुर अंतर्गत व तारकपुर अंतर्गत रस्ते
विकसित करणे

1 कोटी – कोटी टेलिफोन एक्सचेंज ऑफीस ते प्राईम व्हिजन हॉस्पिटल परिसर व गुलमोहोर कॉलनी परिसर
अंतर्गत रस्ते विकसित करणे
90 लाख – वरदविनायक कॉलनी व नरहरीनगर व
किर्लोस्कर कॉलनी ते आसरा सोसायटी
परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण करणे
35 लाख – हरिओम नगर व मार्कडेय कॉलनी अंतर्गत
रस्ता काँक्रीटकरण करणे व डांबरीकरण करणे
1.50 कोटी – गंगा उद्यानमध्ये म्युझिकल फाऊंटन करणे
1 कोटी सिव्हील हडको अंतर्गत रस्ते विकसित करणे
75 लाख – आनंद शाळा समोरील रस्ता ते आसरा सोसायटी
28 लाख – मॉडर्न कॉलनी अंतर्गत रस्ता विकसित करणे
3 कोटी – मेघाग्नी चौक ते सुरेश हिरानंदानी घर ते हडको स्टॉप |ते मकासरे हेल्थ क्लबपर्यंत रस्ता विकसित करणे
75 लाख -अंचवले हॉस्पिटल ते मॉडर्न कॉलनी रस्ता
विकसित करणे
35 लाख- ऐक्यनगर अंतर्गत रस्ता विकसित करणे

10 लाख -गुलमोहर रोड परिसरातील नरहरीनगर
भागातील पालिकेच्या मोकळ्या भुखंडावर
बहुउद्देशीय सभामंडप उभारणे

28 लाख – तारकपुर अंतर्गत रस्ते विकसित करणे

35 लाख – फकीरवाडा व गौरवनगर अंतर्गत रस्ते
विकसित करणे

55 लाख -एकता कॉलनी व कविजंगनगर अंतर्गत रस्ता विकसित करणे

60 लाख -आनंदनगर जिमखाना परिसर अंतर्गत रस्ता विकसित करणे

1 कोटी – जॉगींग ट्रॅक ते कलानगर चौक ते रेणुका माता मंदिर व चैतन्यनगर नवनाथनगर स्टेट बँक कॉलनी व एलआयसी कॉलनी प्रोफेसर कॉलनी अंतर्गत रस्ते विकसित करणे

80लाख – मेघराज कॉलनी व सहकारनगर व विद्या
कॉलनी अभियंता कॉलनी, मॉडर्न कॉलनी
अंतर्गत रस्ते विकसित करणे

1.25 कोटी – ओम स्वीट गुलमोहोर रोड ते खडके घर ते विघ्नहर लॉन्ड्री ते अजय दगडे घर परिसरातील रस्ता विकसित करणे

24 लाख – समतानगर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण करणे

59 लाख – सुर्यवंशी घर ते शितोळे घर ते बजाज घर रस्ता काँक्रीटीकरण करणे

25 लाख – येल्लाराम घर ते पालवे घरापर्यंत रस्ता
विकसित करणे व खरात घर ते गांगर्डे घरापर्यंत रस्ता विकसित करणे

45 लाख – गंगा उद्यान म्युझिकल फाऊंटन येथे आसन व्यवस्था करणे

35 लाख- निलगिरी पार्क अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण

25 लाख – सिव्हील हडको अंतर्गत रस्ते विकसित करणे (दत्त मंदिर परिसर)

55 लाख – पंकज कॉलनी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे

30 लाख – चुग घर ते आशा हाऊसिंग रस्ता काँक्रीटीकरण करणे

20 लाख – झुलेलाल मंदिर ते सिंधी हॉल ते खन्ना
घरापर्यंत काँक्रीटीकरण करणे

35 लाख – नरहरी नगर परिसरात काँक्रीटीकरण करणे

35 लाख – स्वामी बाल उद्यान विकसित करणे व संरक्षण भिंत बांधणे

80लाख -कृपाल आश्रम परिसरात रस्ता विकसित करणे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular