Homeशहरपाणी जपून वापरा; शनिवार पासून मंगळवार पर्यंत पाणी पुरवठा होणार विस्कळीत

पाणी जपून वापरा; शनिवार पासून मंगळवार पर्यंत पाणी पुरवठा होणार विस्कळीत

advertisement

अहमदनगर दि. २
शनिवार दि. ४-२-२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीकडून ३३ के.व्ही. मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग/दुरुस्ती कामासाठी सकाळी ११.०० ते
५.०० वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शट डाउन वेळेत अहमदनगर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेची महत्वाची कामं
कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे शनिवार
दि. ४-२-२०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

दरम्यान काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर
पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवार दि. ४-२-२०२३ रोजी बोल्हेगाव,
नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर,
मुकुंदनगर तसेच सारसनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास
(सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास) पाणीपुरवठा होउ शकणार नाही. सदरचा
पाणीपुरवठा हा रविवार दि.५-२-२०२३ रोजी करण्यात येईल. तसेच रविवार दि.५-२-२०२३ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास
म्हणजेच सिध्दार्थ नगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगांव, चितळे रोड, आनंदीबाजार,
कापडबाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम
रोड परिसर, सावेडी, स्टेशन परिसर, आगरकर मळा, विनायक नगर, कायनेटीक चौक परिसर इ.
भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा
रविवार ऐवजी सोमवार दि.६-२-२०२३ रोजी करण्यात येईल.
सोमवार दि. ६-२-२०२३ रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेडींगेट,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळुबागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी,
माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान
हडको, म्युनिसिपल हडको इ. भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि. ७-२-२०२३ रोजी
करण्यात येईल.
शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

advertisement

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular