Homeराजकारणअखेर पंचवीस तासा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या ठोक्यामुळे महावितरण कंपनीने...

अखेर पंचवीस तासा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या ठोक्यामुळे महावितरण कंपनीने केला महपलिका पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा सुरळीत

advertisement

अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा तोडल्यामुळे गेल्या 24 तासापासून पाणी उपसा बंद करण्यात आला होता. यामुळे पुढील पंधरा दिवस अहमदनगर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून. महावितरण कंपनी आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये तोडगा निघत नसल्याने हा विषय आधांतरी राहिला होता अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सुरुवातीला महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांना जाब विचारला यावेळी महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपासून वेळोवेळी महावितरण कंपनी कडे विज बिल भरले आहे मात्र काही रक्कम थकित आहे असे सांगितले त्यावर कंपनीकडे मोर्चा वळवला मात्र महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता हे बाहेरगावी गेल्या असल्यामुळे हा प्रश्न कोण सोडणार असा प्रश्न उपस्थित राहिल्याने अखेर महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःला कोंडून घेत आंदोलन सुरू केले होते.

त्यानंतर अखेर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आणि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर,माणिक विधाते,सागर बोरुडे,निखिल वारे,बाळासाहेब पवार,विनीत पाऊलबुद्धे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular