Homeशहरफ्लॅट खरेदी व्यवहाराचा धनादेश अनादर प्रकरणी बिल्डरला तेरा लाख दंड आणि तीन...

फ्लॅट खरेदी व्यवहाराचा धनादेश अनादर प्रकरणी बिल्डरला तेरा लाख दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा

advertisement

अहिल्यानगर दिनांक १७ मे

प्लॉट खरेदी व्यवहारात दिलेला धनादेश अनादर प्रकरणी बिल्डरला तिन महिन्यांचा कारावासाची व तेरा लाख नुकसान भरपाईची शिक्षा. अहमदनगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब या न्यायालयाने राजनंदिनी डेव्हलपर्स बिल्डर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन चे प्रो.प्रा. राहुल मच्छिंद्र ससाणे, रा. कोर्ट गल्ली, नालेगाव, अहिल्यानगर यास निगोशिएबल इंस्ट्रुमेंट अॅक्ट कलम १३८ अन्वये दोषी ठरवून तिन महिन्यांचा सश्रम कारावास व रक्कम रूपये १३,००,०००/- रूपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली आहे. नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात न भरल्यास तिन महिने सश्रम करावास भोगण्याची शिक्षा देखील दिलेली आहे. तसेच नुकसान भरपाई रक्कम फिर्यादी यांना देण्याचा आदेश दिलेला आहे.

राहुल मच्छिंद्र ससाणे यांनी स्मिता राहुल काची उर्फ स्मिता राठोड यांचेकडून सन २०२१ मध्ये प्लॉट खरेदी केला होता. प्लॉट खरेदी व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटला नाही. त्यामूळे ससाणे यांनी पुन्हा दुसरा धनादेश दिला होता. तो धनादेश देखील अनादर झाल्याने फिर्यादी स्मिता काची यांनी राहुल ससाणे यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली परंतु ससाणे यांनी फिर्यादी धनादेशाची संपुर्ण रक्कम परत दिली नाही. त्यामुळे फिर्यादी स्मिता काची यांनी राहुल ससाणे यांचे विरूद्ध न्यायालयात फिर्याद दाखल केलेली होती. त्या खटल्यात फिर्यादी तर्फे सादर केलेला पुरावा व साक्षीदारांची साक्ष्य ग्राह्य धरूण न्यायालयाने राहुल मच्छिंद्र ससाणे यांना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. आरोपी राहुल ससाणे तर्फे घेण्यात आलेला बचाव न्यायालयाने फेटाळून लावला. या खटल्यात फिर्यादी स्मिता राहुल काची यांचे करीता अॅड. सुहास. एस. टोणे यांनी युक्तीवाद करून न्यायालयात स्मिता काची यांची बाजु मांडली. त्यांना अॅड. अमित अडागळे व अॅड. विलास ढोणे, अॅड. गौरव हरबा, अॅड. ओम गुंड यांनी सहकार्य केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular