HomeUncategorizedसिव्हिल हाडको परिसरातील न्यायप्रविष्ट असलेल्या मनपाच्या मालकीच्या भूखंडावर अनधिकृत ताबा...खाजगी व्यवसायांना जागा...

सिव्हिल हाडको परिसरातील न्यायप्रविष्ट असलेल्या मनपाच्या मालकीच्या भूखंडावर अनधिकृत ताबा…खाजगी व्यवसायांना जागा भाड्याने देऊन लाखोंचा महसूल होतोय जमा महानगरपालिकेचे दुर्लक्ष.. अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा जनता बांधकाम हटवेल सकल हिंदू समाजाचे महानगरपालिकेला निवेदन…

advertisement

अहमदनगर दिनांक १९ जून

सावेडी परिसरातील मिस्किन मळा आणि सिव्हिल हडको जवळ असणाऱ्या सय्यद हाजी हमिद
तकीया ट्रस्टचा सिव्हिल हाडको या परिसरात
मोकळा भूखंडे असून सदर जमिनी बाबत अहमदनगर महानगरपालिका आणि ट्रस्ट यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू असूनही भूखंडावर महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय मोठमोठे शेड उभारून ते भाड्याने देऊन पैसे कमवण्याचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. विविध फायनान्स कंपनीच्या ओढून आणलेल्या चार चाकी दू चाकी गाड्या या ठिकाणी लावल्या जातात त्यासाठी गोडाऊनचा वापर म्हणून या मोकळ्या भूखंडाचा वापर होतो मात्र यामुळे या परिसरातील रहिवाशांना गुंडांचा त्रास होत असून ठराविक समाजाचे लोक या ठिकाणी रात्री अपरात्री येत असल्यामुळे आणि आरडाओरड करून गदारोळ करत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रासाला समोर जावे लागत आहे. मात्र याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दमदाटी करण्याचे प्रकारही या ठिकाणी होत असून रात्री अप रात्री मोठमोठे टोळके या परिसरात या गोडाऊनमध्ये बसलेले असतात त्यामुळे त्यांच्या सुरू असलेल्या रोजच्या आरडाओरडीमुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारहाण करणे आणि दमलाटी करणे हा प्रकार सर्वात सुरू आहे.

या भूखंडाबाबत सध्या न्यायालयात वाद सुरू असून सुधा काही ठराविक लोक या भूखंडावर अनधिकृतपणे गोडाऊन बांधून ते फायनान्स कंपनीला भाड्याने देत आहेत आणि त्यातून बक्कळ पैसा मिळत असल्याचं समोर आले असून हा मिळालेला पैसा एका ठराविक समाजाला भयभीत करण्यासाठी आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वापरला जात आहे असा आरोप महानगरपालिकेच्या उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

महानगरपालिकेने या ठिकाणी असलेले अनधिकृत फायनान्स कंपनीचे गोडाऊन काढून टाकून कडक कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून हे गोडाऊन उखडून टाकतील त्यावेळी होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी महानगर प्रशासनावर असेल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने घनश्याम बोडखे, सागर ठोंबरे, अक्षय हंपे, मनोज औशीकर, शहदेव पालवे, ऋषी लगड, अंकुश वामन, तुषार तोडमल, शुभम बेद्रे, प्रतीक लालबोन्द्रे, साहिल साळवे यांनी हे नियोजन आज महानगरपालिकेत दिले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular