अहिल्यानगर दिनांक 24 नोव्हेंबर
विधानसभा निवडणूक पार पडली त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत नगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संग्राम अरुणकाका जगताप हे एक लाख 18 हजार 636 मते मिळवून विजयी झाले आहेत. यामध्ये 907 पोस्टल मते संग्राम जगताप यांना मिळाली आहेत.त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना 79 हजार अठरा मते मिळाली आहेत यामध्ये पोस्टल 843 मते त्यांना मिळाली होती.
14 उमेदवारांनी या निवडणुकीत आपले भविष्य आजमावून पाहिले होते मात्र अनेकांना तीन आकडी मतांच्या पुढे मजल मारता आली नाही. यामध्ये उमाशंकर यादव यांना 279 मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन डफळ यांना ११४५ मते मिळाली. शिवाजी डमाळे यांना 337 मते मिळाली. हनीफ शेख यांना 590 मते मिळाली. उत्कर्ष गीते यांना 468 मते मिळाली.गणेश कळमकर यांना 200 मते मिळाले. किरण काळे यांना 50 मते मिळाली शशिकांत गाडे यांना 109 मते मिळाली.प्रतीक बारसे यांना 936 मते मिळाली. मंगल भुजबळ यांना 366 मते मिळाली. सचिन राठोड यांना 113 मते मिळाली सुनील फुलसौंदर यांना 258 मते मिळाली. तर नोटाला 1601 जणांनी मतदान केले. यामध्ये 27 जणांनी पोस्टल मतदानातून नोटा पसंती दिली आहे.
अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाने चार अंकी आकडा गाठला असून इतर उमेदवारांनी तीन आकड्याच्या पुढे मजल मारलेली दिसून आली नाही. त्यामुळे 12 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.