Homeराजकारणमहाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांची एकदाच मोठी आघाडी मात्र पुन्हा... केडगाव...

महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांची एकदाच मोठी आघाडी मात्र पुन्हा… केडगाव पॅटर्नही फेल… केडगावकरांनी दाखवून दिली मतदानातून आपली ताकद..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 24 नोव्हेंबर

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून अहमदनगर शहर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम अरुण काका जगताप हे जवळपास 39 हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आले असून पहिल्या फेरीपासूनच संग्राम जगताप हे आघाडीवर होते. बोल्हेगाव पासून सुरू झालेली पहिली फेरी संग्राम जगताप यांचे मताधिक्य वाढवत , गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, तपोवन रोड या संपूर्ण भागात संग्राम जगताप हे आघाडीवरच राहिले मात्र मुकुंद नगर मध्ये अभिषेक कळमकर यांची जादू सुरू झाली आणि या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांना दोन आकडी मते मिळाले तर अभिषेक कळमकर यांना तीन आकडी मते मिळाली आहेत. एका मतदान केंद्रावर 971 मतदान असताना या मतदान केंद्रावर 878 इतकी मते अभिषेक कळमकर यांना मिळाली आहेत तर दुसऱ्या एका मतदान केंद्रात 975 पैकी अभिषेक कळमकर यांना 925 मते मिळाली असून दोन आकडी मते संग्राम जगताप यांना मिळाली आहेत. या भागात जवळपास सात हजारांच्या वर आघाडी अभिषेक कळमकर यांनी घेतली होती मात्र पुढे पुन्हा कोणत्याच भागात अभिषेक कळमकर यांना आघाडी घेता आली नाही.

भिंगार आणि शहर परिसरात संग्राम जगताप यांनी आघाडी घेत ही आघाडी शेवटपर्यंत टिकून ठेवली होती. ज्या केडगाव पॅटर्नचा मोठा बोल बाला झाला होता त्या केडगाव मध्येही संग्राम जगताप यांना चार हजारांपेक्षा जास्त लीड मिळाला असून कोणतीही जादू या ठिकाणी चालली नसल्याचं उदाहरण मतदारांनी मतदान करून दिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला केडगाव मध्ये कमी मतदान मिळाले होते त्यापेक्षा जास्त मतदान विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना मिळाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular