अहमदनगर दि.१५ मार्च
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या कोणी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी खा.सुजय विखे यांना तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते त्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत.अनेकांनी खा.सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते मात्र देवाने त्यांना कौल दिला नाही कारण खा.सुजय विखे यांनी केलेल्या विकास काम आणि त्यांचा मतदार संघातील संपर्क तसेच कामाची हातोटी यामुळे विखे यांनी उमेदवारीची कधी फिकर केलेली दिसली नाही. पक्ष जो तो निर्णय आणि जबाबदारी देईल ते काम करणार आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे या उद्देशाने ते काम करत राहिले आणि त्याचे फळ त्यांना मिळाले असून खासदार सुजय विखे पाटील यांची उमेदवारी अनेकांना बोचणारी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आमदार निलेश लंके आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील जवळीक वाढली होती तसेच अनेक वेळा राम शिंदे यांनी आपण खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले होते तर निलेश लंके यांनाही खासदारकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या त्यामुळे आता या निवडणुकीत अशा काही नेत्यांच्या भूमिका निवडणुकीचा निकाल फिरवू शकतात त्यामुळे येणारा काळ हा अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठमोठ्या घडामोडींचा असणारा असून निवडणुकीच्या आचारसंहितेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे एकदा का आचारसंहिता लागली म्हणजे निवडणुकीच्या पहिल्या अंकाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता हा पहिला अंक कधी सुरू होते याकडेच सर्व मतदारांचे लक्ष आहे.