अहमदनगर दि.१३ मार्च
अहमदनगर येथील ११० वर्ष जुनी नगर अर्बन बँकेत दोनशे एक्कावन कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रूपयांचा घोटाळा प्रकरणी अटक आरोपी संचालक अनिल चंदुलाल कोठारी, रा. माणिकनगर, आरोपी संचालक- अशोक माधवलाल कटारिया, रा.टाकळी ढोकेश्वर, ता. पारने, जि. अहमदनगर, आरोपी संचालक-शंकर घनशामदास अंदानी, रा. भगत मळा, सावेडी, अहमदनगर यांनी जिल्हा न्यायालयात जामिन अर्ज दाखल केले होते. या सर्व आरोपींचे जामिन अर्ज
जिल्हा सत्र न्यायाधीश मे प्रशांत सित्रे यांनी नामंजुर केले आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने युक्तीवाद सन २०१४ ते २०१९ या काळात सदर आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्र, मिळकतीचे बनावट अहवाल इतर बनावट कागदपत्रे तसेच अनेक प्रकरणे मंजुर केली.
सदर आरोपी यांचे खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे दिसून येत आहे. तसेच ऐपत नसताना अनेक कर्ज मंजुर केलेली दिसत आहे. सदर फॉरेन्सीक ऑडीटमध्ये अनेक कर्ज प्रकरणात आरोपीचा सहभाग दिसून येत आहे. यातील आरोपी हे संचालक असताना
गैरव्यवहार केला आहे. तसेच तज्ञ संचालक शंकर अदानी यांचे खात्यावर आठ लाख रूपये आल्याचे दिसून आले आहे. सदर प्रकरणात अर्बन बँकेचे अनेक संचालक फरार आहेत. तसेच अशोक कटारिया यांचे खात्यावर ४५ लाख रूपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सरकार पक्षाच्या युक्तीवादावर सदर अर्ज नामंजुर केले आहे.
सदर जामिन अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके व मंगेश दिवाणे यांनी युक्तीवाद केला. मुळ ठेविदाराचे वतीने अॅड. अच्युत पिंगळे वकिलांनी
युक्तीवाद केला.