अहमदनगर दि.१४
जीवघेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. यात मुले, पशु-पक्षी, वाहन धारक, पादचारी आदींच्या जीवावरही बेतते त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नगरमधल्या काही तरुणांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे.
शुभम किशोर फुलसौंदर (माळीवाडा) अशी कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे.या कारवाईत २६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांजाची विक्री करत होते ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना समजताच .त्यांनी तात्काळ छापा टाकून झेडती घेतली असता. या कारवाईत आरोपी सुमित लोढा याच्याकडून ७ हजार ५०० रु. किमतीचे १५ विविध रंगाचे लायलॉन बंडल, ७ हजार रु. किमतीचे ७ नायलॉन मांजा गुंडाळालेले चक्री व ३ हजार रु. किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शुभम फुलसौंदर याच्याकडून ४ हजार ६००रु. किमतीचे मांजा असलेले सात बंडल व मांजा गुंडाळण्यासाठी असलेली ४ हजार किमतीची इलेक्ट्रिक मोटार असा एकूण ८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचे ९०७ सुमोटो एप्लिकेशन क्र.८/२०२० अन्वये या दोघांवर भादवी १८६० चे कलम १८८, ३३६ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तन्वीर शेख योगेश भिंगारदिवे, अविनाश वाकचौरे, ए पी इनामदार, शाहीद शेख, रवींद्र टकले सलीम शेख, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, प्रमोद लहारे प्रशांत लोळगे म.पो.हे, कल्पना आरवडे, परमासागर यांच्या पथकाने केली आहे.